23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाआतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!

आतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!

फॉरेन्सिस चाचणीनंतर समोर आली माहिती

Google News Follow

Related

कुख्यात गुंड आणि राजकारणी आतिक अहमद याच्या प्रयागराज येथील कार्यालयातील पायऱ्यांवर पसरलेले आणि सोफ्यावर
ठेवलेल्या एका पांढऱ्या कापडावर आढळलेले रक्ताचे डाग हे मानवाचेच असल्याचे फॉरेन्सिक अहवालात आढळून आले आहे.

आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतानाच त्यांची तिघा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली होती. त्यानंतर आतिक अहमद याने केलेल्या गुन्ह्यांचा अधिक तपास सुरू आहे. आतिक अहमद याच्या कार्यालयाचा काही भाग जमीनदोस्त केल्यानंतर प्रयागराज पोलिसांना येथील भिंतीवर रक्ताचे डाग आढळले होते. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने संपूर्ण कार्यालयाची तपासणी करून त्यांचा अहवाल बुधवारी सादर केला. तेव्हा हे रक्ताचे डाग मानवाचे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

हे ही वाचा:

प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

फडणवीसांचे सोडा, पक्षातील आमदाराचे अंतरंग तरी कळतात का?

चालकाची बळजबरी, बेंगळुरूत महिलेने रॅपिडो बाईकवरून मारली उडी !

गुन्हा घडल्याचे ठिकाण हे आतिक अहमदचे कार्यालय असल्यामुळे हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, काही गर्दुल्ले आतिकच्या कार्यालयात चोरी करण्यासाठी घुसले होते. तेव्हा त्यांनी कार्यालयामध्ये बसून मद्यपानही केल्याचे समजते.

अतिक अहमदची हत्या झाली त्याआधी त्याचा मुलगा असद याचाही एन्काऊंटर झाला होता. उमेश पाल हत्याकांडात त्याचा मुलगा सहभागी होता. मात्र तो फरार होता. अखेर झांशी येथे तो सापडला आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा अंत झाला. त्यानंतर काही दिवसांतच अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनाही तीन जणांनी गोळ्या घालून ठार मारले.

आतिक अहमदच्या घरात नेमके सापडले तरी काय?

आतिकच्या चाकिया आणि प्रयागराज येथील कार्यालयांत रक्ताचे डाग इतस्तत: पसरले होते. पायऱ्यांवरही रक्ताचे डाग होते. तसेच, एका सोफ्यावर ठेवलेल्या पांढरा कपड्यावरही रक्ताचे डाग होते. एका कार्यालयात चाकूही सापडला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा