सध्या जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्मची चलती आहे. भारतातही अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. अनेकदा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि हिंसक कंटेंट दाखवला जातो. यामुळे अनेकदा चिंता व्यक्त केली जात होती. अशातच मोदी सरकारने यासाठी मोठे पाऊल उचलले असून अशा प्लॅटफॉर्म्सवर मोठी कारवाई केली आहे. अश्लील आणि हिंसक कंटेंट दाखवणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सरकारने दणका देत ब्लॉक केलं आहे. सोबतच अशा वेबसाईट्स, ऍप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत.
इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबी मंत्रालयाने ही कठोर कारवाई केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स, १० ऍप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. यापूर्वी भारत सरकारने गेल्या वर्षी नेटफ्लिक्स, डिज्नी आणि इतर मुख्य ओटीटींना आपल्या कंटेंटचं स्वतंत्रपणे मॉडरेशन करण्यास सांगितलं होतं. आता कारवाई करण्यात आलेल्या ऍप्सच्या यादीत अनेक मोठी नावे देखील आहेत.
ही कारवाई केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं नाही, तर असे कंटेंट दाखवणाऱ्या वेबसाईट्स, ऍप्स आणि सोशल मीडिया हँडल्सनाही ब्लॉक करण्यात आलं आहे. यामध्ये १२ फेसबुक पेजेस, १७ इन्स्टाग्राम पेजेस, १६ एक्स हँडल्स आणि १२ यूट्यूब चॅनल्सचा समावेश आहे. एकूण १९ वेबसाईट्स, १० ऍप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक करण्यात आले आहेत.
Ministry of I&B blocks 18 OTT platforms for obscene and vulgar content after multiple warnings; 19 websites, 10 apps, 57 social media handles of OTT platforms blocked nationwide, says the government. pic.twitter.com/03ojj3YEiF
— ANI (@ANI) March 14, 2024
हे ही वाचा:
सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीला अमेरिकेची शिष्यवृत्ती
अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !
कारवाई करण्यात आलेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स
- रॅबिट (Rabbit)
- निऑन एक्स व्हीआयपी (Neon X VIP)
- हंटर्स (Hunters)
- हॉट शॉट्स व्हीआयपी (Hot Shots VIP)
- मोजफ्लिक्स (Mojflix)
- मूडएक्स (MoodX)
- बेशरम्स (Besharams)
- अनकट अड्डा (Uncut Adda)
- ट्रिफ्लिक्स (Tri Fliks)
- एक्स प्राईम (X Prime)
- न्यूफ्लिक्स (Nuefliks)
- प्राईम प्ले (Prime Play)
- चिकूफ्लिक्स (Chikooflix)
- फुगी (Fugi)
- एक्स्ट्रामूड (Xtramood)
- ड्रीम्स फिल्म्स (Dreams Films)
- वूव्ही (Voovi)
- येस्मा (Yessma)