पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!

सार्वत्रिक निवडणुकीच्या एक दिवस आधी घडली घटना

पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!

सार्वत्रिक निवडणुकीच्या एक दिवस आधी बुधवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत.या स्फोटात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत.एक अफोट राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर झाला आहे.

पहिला स्फोट बलुचिस्तान प्रांतातील पशीन जिल्ह्यातील खानोजई भागात असणाऱ्या अपक्ष उमेदवार अस्फंदयार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर झाला.पांगुरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी अब्दुल्ला जेहरी यांनी सांगितले की, “अपक्ष उमेदवार अस्फंदयार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला.” या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी सांगितले की, उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर ‘टायमर’ लावलेला हा बॉम्ब एका पिशवीत ठेवण्यात आला होता, त्याचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.

हे ही वाचा:

इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड

नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!

ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ

कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!

तर दुसरा स्फोट बलुचिस्तानच्या किला सैफुल्ला शहरातील राजकारणी फजलुर रहमान यांच्या जमियत उलेमा इस्लाम पक्षाच्या निवडणूक कार्यालयात झाला यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मतदान केंद्रांवर सुरक्षा वाढवत आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस चौकशी करत आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version