अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. यावेळी रशियाच्या दूतावासाजवळ हा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये दोन रशियन राजदूतांसह वीस लोक ठार झाले आहेत. काबुल शहरातील दारूल अमान भागात हा स्फोट झाला असून याच भागात रशियन दूतावास आहे.
या स्फोटातील जखमींचा आकडा स्पष्ट झालेला नाही. मृत्यू आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये आठवडाभरात दोन स्फोट झाले आहेत. बॉम्बस्फोट करणारा हा आत्मघाती बॉम्बर होता. हल्ल्यानंतर तो आत जात असताना सशस्त्र रक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार केले आहे.
यापूर्वी २ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट झाला होता. या स्फोटात प्रमुख मौलवी मुजीब उल-रहमान अन्सारी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह अठरा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात दोनशे जण गंभीर जखमी झाले होते. येथे मुस्लिमांचा धार्मिक सप्ताह साजरा होत असताना मशिदीवर हा हल्ला करण्यात आला होता. याआधी १७ ऑगस्ट रोजी काबूलमधील एका मशिदीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये वीस जणांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’
‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’
हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?
५० फुटवरून झुला खाली आदळला आणि
तालिबानचे सरकार आल्यापासून अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोट थांबण्याचे नाव घेत नाहीत. हे बॉम्बस्फोट साधारणपणे शिया आणि अहमदिया समुदायाच्या मशिदींवर झाले आहेत.