जम्मू विमानतळाच्या टेक्निकल परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. काल रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाले. जम्मू पोलिसांनी याची पुष्टी केली आहे. या स्फोटांत दोन जण जखमी झाले असून, त्यांना सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. जम्मू पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. खबरदारी म्हणून बॉम्ब डिस्पोजल टीम आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाचा आवाज खूप दूर ऐकायला गेला.
Two low-intensity explosions were reported early Sunday morning in the technical area of Jammu Air Force Station. One caused minor damage to the roof of a building while the other exploded in an open area. There was no damage to any equipment. Probe on: Indian Air Force pic.twitter.com/gHBEMhCt7j
— ANI (@ANI) June 27, 2021
या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालय तसेच जम्मूचे मुख्य विमानतळही याच परिसरात येतं. स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी हवाई दल, भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी दाखल झाले आहेत.
पोलीस आणि भारतीय सेना वेगवेगळ्या शक्यतांचा तपास करत आहेत. या स्फोटामागे दहशतवाद्याचा हात असल्याचं बोललं जात आहे. परंतू अद्याप पोलिसांनी कोणत्याच गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा वेगाने तपास करीत आहोत आणि लवकरच सत्य समोर येईल.
हे ही वाचा:
कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ
मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल
इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी
गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!
स्फोट झाला त्या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालय तसेच जम्मूचे मुख्य विमानतळही याच परिसरात येतं. स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी हवाई दल, भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी दाखल झाले आहेत.