पंजाबमधील सुवर्णमंदिराच्या जवळील हेरिटेज स्ट्रीटवर झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी राती बारा वाजण्याच्या सुमारास अत्यंत जगबीजलेलेया भागात हा अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर या भागातीळ नागरिक घाबरले आणि एकच गोंधळ उडाला. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामध्ये पाच ते सहा भाविक जखमी झाले. पोलिस तपासात हा अपघात असल्याचे समोर आले आहे.पोलीस या स्फोटाच्या कारणांचा अभ्यास करत आहेत.
वर्दळीच्या हेरिटेज स्ट्रीटवर लोक फिरत असतांना अचानक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सारागढी सराईसमोर आणि पार्किंगच्या अगदी जवळ मोठा स्फोट झाला. घटनास्थळाच्या जवळच बसने परराज्यातून आलेले सुमारे ५० पर्यटक होते. यामध्ये मुलांची संख्या जास्त होती. सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही.स्फोटाच्या धक्क्याने जवळच्या रेस्टॉरंट आणि सारागढी सराईच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि पाच ते सहा पादचारी जखमी झाले.
घटनेच्या वेळी स्फोट स्थळाजवळ ऑटोरिक्षात बसलेल्या सुमारे सहा मुलींना काचेच्या तुकड्यांचा फटका बसला आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली असे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथके स्फोटामागील नेमके कारण तपासत आहेत.
स्फोटामध्ये फक्त खिडकीच्या काचेचे नुकसान झाले आहे आणि इमारतींचे कोणतेही नुकसान झाले नाही असे पंजाबचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त डॉ. मेहताब सिंग यांनी सांगितले. हेरिटेज स्ट्रीटवरील एका रेस्टॉरंटच्या चिमणीत हा स्फोट झाल्याची पुष्टी एका पोलीस अधिकाऱ्याने केली, परंतु नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !
‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’
६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही ! ‘
द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !
घटना दहशतवादी नाही
घटना दहशतवादी नाही, हे स्पष्ट आहे. मात्र यामागचे कारण आताच सांगता येणार नाही. फॉरेन्सिक विभागाचे पथक आज तपास करणार आहेत. नमुने घेतले जातील. त्यानंतरच पार्किंगच्या काचा कशा फुटल्या हे स्पष्ट होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरिंदर सिंग यांनी सांगितले. अमृतसरचे पोलीस आयुक्त यांनी अमृतसरमधील स्फोटांशी संबंधित एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेचे तथ्य प्रस्थापित करण्यासाठी तपास सुरू आहे आणि घाबरण्याची गरज नाही. नागरिकांना शांतता राखावी असे आवाहन केले आहे.