जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात एका वाहनात स्फोट झाला. यादरम्यान लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘शोपियानमध्ये भाड्याने घेतलेल्या एका खासगी वाहनात स्फोट झाला. तीन सैनिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या स्फोटाचं नेमकं कारण तपासण्यात येत आहे.’ काश्मीर झोन पोलिसांनी पहाटे याची ट्विट करून माहिती दिली आहे. वाहनाचा स्फोट स्फोटकांनी झाला की वाहनाच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार

RBI ची ‘सोन’ पावलं !

१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी

जीएसटी परतावा मिळाला, आता इंधनदर कमी होणार का?

गेल्या दोन दिवसांत शोपियानमध्ये घडलेली ही दुसरी दहशतवादी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. एक दिवस आधी म्हणजे बुधवारी संध्याकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका नागरिकाला गोळ्या घालून जखमी केलं होतं.या जखमी नागरिकावर उपचार सुरु आहेत. ही घटना शोपियान जिल्ह्यातील कीगममधील राख-चिद्रेन गावात घडली. एक दिवसापूर्वी कुलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रजनी बाला या शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. अशा एका पाठोपाठ एक घटना घडत असल्याने लष्कराने परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेतली आहे.

Exit mobile version