रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. त्यामुळे या एमआयडीसीतील आणखी एका कंपनीला भीषण आग लागली असल्याने, परिसरात घबराट पसरली आहे.
आज सकाळी एम आर फार्मा या कंपनीत हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर या कंपनीला भीषण आग लागली. हा धमाका एवढा जबरदस्त होता, की त्यामुळे परिसरातील काही कार्यालयांच्या काचा फुटून गेल्या. त्याशिवाय ही आग देखील भीषण होती. या आगीमुळे उठलेले धुराचे लोळ तब्बल १० किमी लांबून स्पष्टपणे दिसत होते. या घटनेनंतर अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने हजर झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील करायला सुरूवात केली. या घटनेतील मृतांबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.
हे ही वाचा:
१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
‘या’ गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण
दिल्लीत एनसीटी कायदा लागू, काय आहे हा कायदा?
या एमआयडीसीतील ही सहावी घटना आहे. यापूर्वी देखील या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. गेल्या महिन्यात २० मार्च रोजी घरडा केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या अपघातात चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यापूर्वी आणखी एका केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला होता. तो ही अतिशय भयानक अपघात ठरला होता. त्या अपघातातही तीन जणांचा मृत्यु झाला होता.
सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांकडून संतप्त सवाल करण्यात येत आहे. अजूनपर्यंत स्थानिक प्रशासनाने काहीच पावले का उचलली नाहीत असा प्रश्न केला जात आहे.