पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी महाराष्ट्रात येणार असल्यामुळे या प्रकरणाचा गंभीरपणे तपास केला जात आहे. राशिद शेख असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील भवानी पेठ या परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता एवढी होती की संबंधित व्यक्तीच्या घराच्या काचा फुटल्या आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये स्फोटाचा धक्का जाणवला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक नाशक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळला भेट दिली.
हे ही वाचा:
कुवेतमध्ये नुपूर विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हाकलणार
मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या
“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”
‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’
या प्रकरणी पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या राशिद शेख नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची कमालीची गुप्तता बाळगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे १४ जून रोजी येणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून संशयितांची तपासणी आणि चौकशी केली जात आहे.