कल्याण शहाड येथील सेंच्युरी कंपनीतील एका विभागात मोठा स्फोट होऊन या स्फोटात ५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण या स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी सेंच्युरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला मात्र स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील शहाड आणि उल्हासनगर परिसरात सेंच्युरी रियान ही कंपनी आहे. शनिवारी सकाळी १२ वाजण्या च्या सुमारास या कंपनीच्या सीएस२ विभागात मोठा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर,परिसरातील घरांना हादरे बसले होते.
हे ही वाचा:
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येण्याला पाकिस्तान संघाला अद्याप हिरवा झेंडा नाही
ऑस्ट्रेलियावर मात करत भारत ठरला क्रमांक एकचा एकदिवसीय क्रिकेट संघ
स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न
लाइनमध्ये सतरा तास उभे राहून आयफोन १५ खरेदी!
या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ उपचारासाठी सेंच्युरी रुग्णालयात आणण्यात आले त्यापैकी ५ कामगाराचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस , बॉम्ब स्कॉड, अग्निशमन दल, एटीएसचे पथक, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कामगारांना बाहेर काढण्यात येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा स्फोट बॉयलरचा झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.