पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी

पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी

पुण्यामध्ये चोरी-मारी आणि लुटपटीच्या घटना वाढत आहेत. मात्र आता पुण्यात चोरांनी स्वतःचाच जीव धोक्यात घालून चोरी केल्याची घटना पाहायला मिळत आहे. येथे चोरट्यांनी स्फोटकांचा वापर करून एटीएम उडवले आहे. यानंतर चोरट्यांनी एटीएममधून सुमारे १६ लाख रुपये काढून घेतले.

ही घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात घडली. रविवारी पहाटे हा प्रकार पाहायला मिळाला. चोरट्यांनी एक योजना आखून ती राबवली. त्यावेळी या परिसरात शुकशुकाट होता आणि त्याचवेळी काही लोक एटीएमजवळ पोहोचले. त्यांनी जिलेटीनच्या काठीच्या सहाय्याने खासगी बँकेचे एटीएम फोडले.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस डीसीपी मंचक इप्पर यांनी सांगितले की, चोरांनी प्रथम स्फोटकांचा वापर करून बँकेचे एटीएम फोडले आणि नंतर पुणे शहराजवळील आळंदीजवळील एटीएम पळवून नेले. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की चोरट्यांनी सुमारे १६ लाख रुपये घेऊन पळ काढला.

या प्रकरणाची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि निष्क्रीयीकरण पथकासह तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने माहिती गोळा करण्यात येत आहे. काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले आहे, मात्र चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नसून लवकरच ती माहिती उघड होईल. अशी माहिती पोलसांनी दिली.

हे ही वाचा:

 

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

या घटनेनंतर एटीएमची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये स्फोटकांनंतर एटीएमचे काही भाग उडून गेल्याचे दिसून येत आहे. पुणे ग्रामीण भागातील या वर्षातील ही दुसरी घटना आहे, ज्यात एटीएम उघडल्यानंतर स्फोटकांनी पैसे चोरनयेत आले. जुलै महिन्यात चाकण परिसरात अशीच एक घटना समोर आली होती.

Exit mobile version