28 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरक्राईमनामाछत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

सीआरपीएफ जवान जखमी

Google News Follow

Related

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील २० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मिझोराममधील सर्व ४० जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत असताना गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

सुकमाच्या तोंडामार्का भागात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. छत्तीसगड निवडणूक ड्युटीवर हा शिपाई तैनात होता. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या कानखेड जिल्ह्यात आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन मतदान कर्मचारी जखमी आहेत. सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवानही जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. त्यावेळी सुरक्षा दलांच्या निगराणीखाली चार मतदान पक्ष आपापल्या मतदान केंद्राकडे जात होते. ही घटना लहानबेठिया पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

हे ही वाचा:

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २५ महिलांसह एकूण २२३ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांच्यासाठी एकूण ४० लाख ७८ हजार ६८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ५ हजार ३०४ निवडणूक केंद्रे तयार करण्यात आली असून २५ हजार २४९ मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा