नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

नागपुरातील सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आहे.नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी आहे.आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

नागपूर अमरावती रोडवरील सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला.कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे.

हे ही वाचा:

लंडनमध्ये भारतीय विद्यार्थी बेपत्ता, भाजप नेत्याने एस जयशंकर यांची मागितली मदत!

संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत!

माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!

बिहारमध्ये डॉक्टरांची दारू पार्टी!

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता.त्यांनतर यात वाढ होऊन एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी आले. तसेच बचावपथकही दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यंमत्री शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version