बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

स्फोटके ठेवणारी व्यक्ती २८ ते ३० वर्षांची

बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

बेंगळुरूमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले आहेत. येथे बॉम्ब पेरणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले. तर, हा आयईडी स्फोट असून एका पुरुषाने पिशवीतून आयईडी नेऊन कॅफेमध्ये ठेवल्याचे दिसत आहे.

कॅफेमध्ये स्फोटके ठेवणारी व्यक्ती ही २८ ते ३० वर्षांची आहे. आरोपीने रवा इडलीचे कुपन घेतले मात्र तो न खाताच कॅफेबाहेर निघाला. तेव्हा त्याने त्याच्याकडील पिशवी तिथेच ठेवली. त्यातच आयईडी स्फोटके असावी, असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले. मात्र या व्यतिरिक्त परिसरात कोणतेही आयईडी आढळले नाहीत, असे समजते. कॅफेमध्ये पिशवी ठेवणाऱ्या व्यक्तीने कॅश काऊंटरवरून कूपन घेतले होते. त्या कॅशिअरची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का, अशी विचारणा त्यांना केली असता, त्यांनी तपास अद्याप सुरू असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

आसाराम बापू तुरुंगातच राहणार

विधानसभेत विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी

‘हा मोठ्या प्रमाणावरील स्फोट नव्हता. हा आयईडी स्फोट होता. अशा गोष्टी आधीही घडल्या आहेत, त्या घडता कामा नये. गेल्या काही काळात, अशा प्रकारचे स्फोट घडले नव्हते. अपवाद भाजपची सत्ता असताना मेंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेचा. आमच्या सत्ताकाळात पहिल्यांदाच अशी घटना घडली,’ असे त्यांनी सांगितले. या स्फोटात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसह ग्राहक जखमी झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्फोट झाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेव्हा कॅफेमध्ये कुठेही आगीच्या ज्वाळा नव्हत्या. त्यानंतर बॉम्बनाशक व फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली.

Exit mobile version