मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

रेमडेसिविरचा तुटवडा असताना, अंधेरीत एका औषध दुकानात चालू असलेला रेमडेसिविरचा काळाबाजार पोलिसांनी उघडकीस आणला.

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

Photo Credit ANI

महाराष्ट्रात कोविडवरील उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर औषधाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर औषधाचा साठा हस्तगत करण्यात आला.

महाराष्ट्रात सध्या कोविडची दुसरी लाट आली आहे. कोविडवरील उपचारांत वापरले जाणारे रेमडेसिविर हे एक महत्त्वाचे औषध आहे. सध्या राज्यात त्याचा तुटवडा असताना काही नफेखोरांनी त्याची साठवणुक करून काळाबाजार करण्याचा उद्योग आरंभला होता. अंधेरी येथे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका औषधाच्या दुकानावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २७२ रेमडेसिविर इन्जेक्शनचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणात दोन जणांना तुरूंगात टाकण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अमेरिका- युरोपने कोविशिल्डचा कच्चा माल रोखला

काय डेंजर वारा सुटलाय

सध्या महाराष्ट्रात रेमडेसिविरच्या इन्जेक्शनला मोठी मागणी आली आहे. महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या भयंकर लाटेशी झुंजत असताना काहींनी या औषधाच्या काळ्याबाजाराला सुरूवात केली होती. अवाच्या सवा किंमतीला या औषधाचे एक इन्जेक्शन विकले जात होते. त्यावेळी ठाकरे सरकारने या औषधाच्या किंमतीवर कमाल मर्यादा घातली आहे.

रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला लक्ष्य केले होते. हे औषध इतर राज्यांतून आपल्याकडे लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे विरोधी पक्षांनी सुनावले होते.

Exit mobile version