पुण्यात जादूटोण्याचा अघोरी प्रकार गर्भधारणेसाठी सुनेला पाजले हाडाचे पाणी

सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यात जादूटोण्याचा अघोरी प्रकार  गर्भधारणेसाठी सुनेला पाजले हाडाचे पाणी

विद्येचे माहेरघर ,जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून अंधश्रद्धेचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गर्भधारणेसाठी एका महिलेला हाडांची राख खाऊ घालण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील सिंहगड भागात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी संबंधित महिलेचा पती, नातेवाईक आणि तांत्रिकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिला आयोगाने पोलीस प्रशासनाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

पीडितेचे २०१९ मध्ये लग्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लग्नाला बरीच वर्षे झाली तरी तिला मूल झाले नाही. मुल पाहिजे म्हणून सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याचा पीडितेने आरोप केला आहे. . त्यानंतर तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी अमावस्येला काळ्या जादूचे विधी केले. यामुळे महिला गरोदर राहील, असा विश्वास कुटुंबियांना होता. अमावस्येच्या दिवशी रात्री सर्वजण स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली आणि राख मडक्यात घेतली. सुनेला मानवी हाडांची राख पाण्यात टाकून ते पाणी पाजण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आम्ही विश्वास ठेवण्यायोग्य शेजारी आहोत; श्रीलंकेला भारताने केले आश्वस्त

‘घटनाबाह्य’ कार्यक्रमांची आमंत्रणं हवीत कशाला?

ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा व्ही.पी.सिंह केला…

अंधारेबाईंचा ‘अगरबत्ती’वाल्यांवर प्रहार

घरच्यांनी जादूटोण्यामध्ये भाग घेण्यास भाग पाडले. आरोपी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते आणि माहेरकडून पैसे आणायला सांगत असा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णु पोकळे, दिपक जाधव आणि स्नेहा जाधव यांच्याविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेचा छळ आणि नरबळी व अमानुषअनिष्ट प्रथा जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सिंहगड पोलिसांनी म्हटले आहे.

Exit mobile version