भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात या पदाधिकाऱ्याचे मॉर्फ केलेले अश्लिल फोटो एका व्यक्तीने त्या महिला पदाधिकाऱ्याला पाठवून धमकी दिल्याचे तिने म्हटले आहे.
वर्सोवा पोलिसांनी तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्याविरोधात मी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानेच मला असे अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. ३१ मे रोजी मी घरी असताना माझ्या मोबाईल क्रमांकावर माझा चेहरा मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. शिवाय, त्याने मेसेजही केला की, मनोज चंद्रकांत परब यांनी माझ्याकडून ५६०० रु. कर्ज घेतले आहे. त्यांनी तुमचा नंबर दिला आहे. मनोज परबने जर कर्जाची परतफेड केली नाही तर माझे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. पण मी कर्ज देणारी आणि कर्ज घेणारी अशा दोन्ही व्यक्तींना ओळखत नाही. त्यामुळे मी हे मेसेज पाठविणाऱ्याविरोधात तक्रार करत आहे.
हे ही वाचा:
राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू
राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीचे समन्स
सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक
‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात
दीपाली सय्यद यांच्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे कुणीतरी राग धरून मला हे मेसेजेस पाठवले आहेत. त्याच्याविरोधात कारवाई करावी. या महिलेने म्हटले आहे की, दीपाली सय्यद यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि मी त्याचा व्हीडिओ पाहिला. त्याविरोधात मी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावर चौकशी सुरू आहे.