बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयाचे कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली होती असा दावा केला होता, सुशांतच्या शवविच्छेदनाच्यावेळी आपण तेथे होतो असे शाह म्हणाले होते. आता यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेल्याचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रूपकुमार शाह मृतदेह घेऊन जाताना दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अलीकडेच रुपकुमार शाह यांनी सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला होता. सुशांतच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा असल्याचे शाह म्हणाले होते. तर नितेश राणे यांनी पोस्टमॉर्टमच्या वेळी रूपकुमार शहा हजर असल्याचे ट्विट केले आहे.
It’s clear that Roop Kumar shah was the man carrying SSR s body..
He was there during the PM..
the truth is finally coming out..
Ab baby penguin door nahi hai..
Justice will be done! pic.twitter.com/RiQo0PVeuR— nitesh rane (@NiteshNRane) January 2, 2023
शवागारात नोकर म्हणून काम करणाऱ्या रूपकुमार शाह यांनी सुशांतचा खून झाल्याचा दावा केला आहे. नितेश राणे यांनी उपचार केले आणि सांगितले की, रूपकुमार शहा हे १३ ते १४ जून २०२० या कालावधीत कूपर हॉस्पिटलच्या शवागारात कर्तव्यावर होते. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि बेबी पेंग्विन दूर नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
रूपकुमार शाह हा सुशांत सिंग राजपूत खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार मानला जात आहे. शवविच्छेदन अहवालात राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुशांत सिंग राजपूत आणि त्यांची मॅनेजर दिशा सानियान यांच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप भाजपचे काही नेते करत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. रुपकुमार शाह यांनाही विशेष संरक्षण देण्यात आले आहे.