मिरा – भायंदर येथील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या मोटारीचा वरळी सी लिंक येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला.या अपघातात मुलगा तक्षशील हा किरकोळ जखमी झाला असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्षशीलच्या विरोधात निष्काळजीपणे भरधाव वेगाने मोटार चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्षशील नरेंद्र मेहता (१९) हा शनिवारी सकाळी वांद्रे येथून वरळी येथे आपल्या ‘लॅम्बोर्गिनी हुराकन कूप माय १५’ या महागड्या मोटारीने भरधाव वेगाने जात असताना त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार थेट सी लिंक च्या कठड्याला धडकली. मोटारी तील एअर बॅग उघडल्याने तक्षशील हा या अपघातात बचावला असला तरी त्याच्या उजव्या हाताला भाजल्याच्या जखम झाली.
हे ही वाचा:
आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे अभिनंदन
जालना आंदोलनातून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न
ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?
ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम
या अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनास्थळी दाखल झालेल्या वरळी पोलिसांनी तात्काळ तक्षशील याला मोटारीतून बाहेर कडून पोद्दार रुग्णालयात उपचारासाठी आणून त्याच्यावर उपचार करून वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी वरळी पोलिसांनी तक्षिल विरोधात निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.