26 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाबीडमध्ये चोरांचा सुळसुळाट... भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले

बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले

Google News Follow

Related

बीड जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संचारबंदीचा फायदा घेऊन चोरट्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. आता चोरटयांनी एका भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले आहे. भाजप नेते अक्षय मुंदडा यांच्या शिपायासोबत हा प्रकार घडला आहे. लूटमार करताना चोरटयांनी शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्याला चोर लुटू शकतात मग सामान्य नागरिकांचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अक्षय मुंदडा हे भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील अंबाजोगाई येथे मुंदडा यांच्या शिपायाला चोरांनी लुटले. चोरांनी त्यांचे लॉकेट आणि रोख रक्कम लुटली आहे. हा प्रकार समोर येताच आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. लूटमार करताना चोरांनी शिपायाच्या गळ्याला चाकू लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत सहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक केलं असून पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

शाळा सुरू होणार म्हणजे काय रे भाऊ?

नागपुरात नग्न नृत्याचा ‘हंगामा डान्स’

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

 

मागच्या आठवड्यात बीडमधील एका आरोग्य कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरटयांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता . कृषी कर्यलायच्या परिसरातही चोरीचा प्रकार घडला आहे. बीडमध्ये दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिक कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा