उज्जैनमध्ये निवृत्त सैनिकाचा भाजप नेत्यावर गोळीबार !

रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

उज्जैनमध्ये निवृत्त सैनिकाचा भाजप नेत्यावर गोळीबार !

उज्जैनच्या नागझिरी पोलीस स्टेशन हद्दीतील हमू खेडी येथे राहणाऱ्या भाजप नेत्यावर एका निवृत्त लष्करी जवानाने गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागझरी पोलीस ठाण्यात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांबाबतच्या वादातून दोन्ही बाजूने वाद सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी निवृत्त सैनिक देखील हमू खेडी येथील रहिवासी आहे.

उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, प्रकाश यादव यांच्यावर काल (१८ जुलै ) रात्री सेवानिवृत्त सैनिक एसपी भदौरिया यांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्यांना उज्जैन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाजप नेते प्रकाश यादव यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहित आहे. तसेच रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या नादी लागले, म्हणून जरांगे भरकटले !

मुस्लीमांना हव्या विधानसभेच्या ३२ जागा; ठाकरे-पवार मनावर घ्या…

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

पाकिस्तानात अल-कायदाच्या म्होरक्याला अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू होते. वाद मिटविण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र जमले होते. मात्र, यावेळी आरोपी भदौरियाने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. या घटनेत प्रकाश यादव जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी निवृत्त सैनिक फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ सुनील भदौरियाला ताब्यात घेतले आहे. पोलसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या कुटुंबीयांनीही प्रकाश यादव यांची विचारपूस केली आहे.

Exit mobile version