उत्तर प्रदेशमध्ये भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे भाजपा नेते प्रमोद यादव यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारांदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे भाजपाचे नेते प्रमोद यादव यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार, ही घटना जौनपूरमधील बक्सा ठाणे क्षेत्रातील बोधापूर येथे घडली. तिथे अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेते प्रमोद यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
भाजपाने २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मल्हनी विधानसभा मतदारसंघातू प्रमोद यादव यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे पशुपतीनाथ यादव विजयी झाले होते. तर धनंजय सिंह याची पत्नी जागृती सिंह ही दुसऱ्या स्थानी राहिली होती. धनंजय सिंह यांना नुकतीच उत्तर प्रदेशातील जौनपूर न्यायालयाने अपहरण आणि खंडणी प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
हे ही वाचा :
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स
पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता
या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत कुणाविरोधातही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी तपास करत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी केली जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचा शोधही घेतला जात आहे.