जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागातील भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यु झाला आहे.
जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागात भाजपा नेते जसबिर सिंग यांचे घर आहे. गुरुवारी सायंकाळी जसबीर सिंह आपल्या कुटुंबासोबत आपल्या घरीच निवांत बसले असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेडच्या सहाय्यानं घडवून आणलेल्या या हल्ल्यात जसबीर सिंह बचावले आहेत.
भाजपच्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याची दहशतवाद्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीही अनंतनागमध्ये भाजपशी निगडीत सरपंच गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी यांची हत्या करण्यात आली होती. आपल्याला दहशतवाद्यांकडून वारंवार धमक्या मिळत होत्या, मात्र सुरक्षेबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचा आरोप कुटुंबानं केलाय. १५ ऑगस्टपूर्वी जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आलाय. स्वातंत्र्यदिनापूर्वी संपूर्ण खोऱ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसंच मोठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
संजय राठोड अजून मोकाट कसा फिरतोय?
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
औद्योगिक क्षेत्राची घोडदौड सुरू
या बद्दल ट्वीट देखील करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये जसबीर सिंह बाँब ग्रेनेडच्या झालेल्या हल्ल्यामुळे विव्हळताना दिसत आहेत.
#BREAKING: Grenade attack at the residence of local BJP leader Jasbir Singh in Khandli area of Rajouri in Jammu & Kashmir. Five people injured in the grenade blast. Area has been sealed and search ops are underway. pic.twitter.com/yo54yFMsQ0
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2021