उतरप्रदेशातील मुरादाबाद मध्ये एका भाजप नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. न्यू मुरादाबाद येथील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटी येथील घटना आहे.भाजप नेते अनुज चौधरी हे सोसायटी बाहेर फिरत असताना तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.जखमी झालेल्या अनुज चौधरी यांना त्वरित रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भाजप नेते अनुज चौधरी त्यांच्या भावासोबत सोसायटी बाहेर फेरफटका मारत असताना हा हल्ला झाला.या घटनेचे आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
अनुज चौधरी (३५) भाजप नेते तसेच असमोली ब्लॉकचे प्रमुख उमेदवार होते. न्यू मुरादाबाद येथील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटी बाहेर भाजप नेते अनुज चौधरी आणि त्यांचा भाऊ फिरायला गेलेले असताना चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.या घटनेचे आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. फुटेज मध्ये दिसून आले की, अनुज चौधरी यांना गोळी लागल्याने ते जमिनीवर कोसळले. मात्र, त्यानंतरही दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
हे ही वाचा:
बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद
रोनाल्डो ठरला इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून समन्स
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तांसह घटनास्थळी दाखल झाले.चौधरी यांच्यावर हल्ला झाल्याचे कारण अद्याप समजले नसले तरी ब्लॉक प्रमुखाची निवडणूक लढवल्यापासून अनुज चौधरी यांचे काही लोकांशी वैर असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी अनुज चौधरी हे निवणूक हरले असले तरी आता त्यांनी विद्यमान ब्लॉक प्रमुखांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरू केली होती.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसएसपी म्हणाले की, घटनास्थळी बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी ३१५ बोअर, ३२ बोअर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. आता नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत संबंधित दोन जणांची माहिती मिळाली आहे. यातील एक आरोपी संभल जिल्ह्यातील रहिवाशी असून मृत अनुज हा देखील संभलचा रहिवाशी आहे.या प्रकरणी पोलीस तपासासाठी दोन सीओ, तीन पोलीस ठाण्याचे पोलीस आणि एसओजी अशी पोलीस पथके तयार करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.