भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरुच असून नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भजाप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही हत्या राजकीय पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या चार दिवसात नाशिक मधील तिसरी हत्या असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत आणि कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

एक लस असेल तर एक पेग

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’

भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. तर ऐन दिवाळीत आरपीआयची महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली होती.

Exit mobile version