भोजपूर पोलिस आणि बिहार स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) संयुक्त कारवाईत एका महिला ग्रामप्रमुखाच्या घरातून एके-४७, दोन हातबॉम्ब, चार मॅगझिन आणि ४३ गोळ्या जप्त केले आहेत. गुन्हेगारी कारवायांचा गड मानल्या जाणाऱ्या उदवंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलाऊर गावात ही कारवाई करण्यात आली. या गावातील कुख्यात गुंड बुटन चौधरीच्या अटकेसाठी हा छापा टाकण्यात आला होता. मात्र, मुख्य आरोपी फरार झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुंड बुटन चौधरी याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस आहे. पोलिसांकडून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान, त्याच्या अटकेसाठी पथकाने छापा टाकला होता. मात्र, तो सापडला नाही. सध्या तो फरार आहे. परंतु, या कारवाई आरोपी बुटन चौधरीचा भाऊ उपेंद्र चौधरीला अटक करण्यात आली आहे.
आम्ही भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली बुटनचा भाऊ उपेंद्र चौधरी याला अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि बुटन चौधरीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत,” असे भोजपूरचे एसपी राज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे ही वाचा :
संघप्रमुख मोहन भागवत लखनऊमध्ये दाखल
ट्रंप यांनी इराणसोबत थेट चर्चेची केली घोषणा
पंजाबमध्ये कायदा, सुव्यवस्था कोलमडली
‘मुद्रा’मुळे स्वप्नातले कसे उतरले सत्यात
बुटन चौधरीच्या घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान, त्याच्या घरातून एके-४७ असॉल्ट रायफल, एके-४७ चे दोन मॅगझिन, एके-४७ चे ४३ जिवंत काडतुसे, दोन हँडग्रेनेड आणि इन्सास रायफलचे दोन मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत,” असे एसपी राज म्हणाले. अटक करण्यात आलेला उपेंद्र चौधरी हा बेलौर पंचायतीच्या मुखिया उर्मिला देवी यांचा पती आहे. गुन्हेगारी सहभाग आणि बेकायदेशीर साहित्य बाळगल्या प्रकरणी तपास सुरु असून पुढे कायदेशीर कारवाई होऊ शकते असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
#WATCH | Bihar: AK-47, two hand grenades, four magazines and 43 bullets seized from the residence of a woman Village Head in Bhojpur. One man arrested.
(Video: Bhojpur Police) pic.twitter.com/orL3XJDfM8
— ANI (@ANI) April 8, 2025