बिहारच्या नौगाछिया येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.२०२१ मध्ये गावसोडून पळून गेले जोडपे आपल्या मुलीसह बुधवारी (१० जानेवारी) गावी परतले असता तिघांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, चंदन कुमार त्याची पत्नी चांदनी आणि त्याची दोन वर्षांच्या मुलीची गोळ्याझाडून हत्या करण्यात आली.हल्लेखोर दुसरे कोणी नसून चंदन कुमार याची पत्नी चांदनी हीचे वडील आणि महिलेचा भाऊ आहेत.महिलेच्या वडिलाने आणि भावाने मिळून या तिघांवर गोळ्या झाडल्या.
याप्रकरणी नौगाछियाचे एसपी सुशांत कुमार सरोज यांनी सांगितले की, २०२१ मध्ये हे जोडपे गावातून पळून गेले होते.मृत चांदनीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नातेसंबंधाला कधीही मान्यता दिली नाही म्हणून त्यांनी पळवून जाऊन लग्न केले होते.
हे ही वाचा:
कॉंग्रेसने राम मंदिर निमंत्रण नाकारून पापक्षालनाची संधी गमावली
मेहबुबा मुफ्तींच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावल्या!
मुलाचा मृतदेह लपवून नेणारी सुचाना सेठ बेंगळुरूमधील वाहतूककोंडीमुळे अडकली
लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
आम्हाला बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास हत्येची माहिती मिळाली.चंदन आणि चांदनी एकाच गावचे होते २०२० च्या सुरुवातील हे जोडपे प्रेमात पडले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.ते पुढे म्हणाले की, हे जोडपे आपल्या दोनवर्षांच्या मुलीसह गावात परतले.हे तिघे त्यांच्या गावात बांधण्यात आलेल्या नवीन घराकडे जात असताना, मृत चांदणीचे वडील पप्पू सिंग यांनी महिलेचा पती चंदनवर रॉडने हल्ला केला आणि त्यांचा मुलगा धीरज कुमारला येण्यास सांगितले.
त्यानंतर त्यांनी तिघांचीही गोळ्या झाडून हत्या केली.ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की, फॉरेन्सिक तज्ञ गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.
न्याय मिळवण्यासाठी चंदनचा मोठा भाऊ केदार नाथ याने सांगितले की, माझा भाऊ चंदन हा याच गावात राहणाऱ्या चांदणी या तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न केले.हे दोघेही अत्यंत आनंदित होते.त्यांना दोन वर्षांची मुलगी होती.हे कुटुंब गावी परतल्यावर तरुणीच्या वडिलाने आणि तिच्या भावाने मिळून त्यांची हत्या केली आणि तेथून ते पळून गेले, असे त्याने सांगितले.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.