दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटना अल कायदापासून प्रेरित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलचे नेतृत्व रांचीचे रहिवासी डॉ. इश्तियाक करत होते. भारतात दहशतवादी घटना घडवण्याचा त्यांचा कट होता. यासाठी मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. राजस्थानच्या भिवडी येथून शस्त्र प्रशिक्षण घेणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय झारखंड आणि यूपीमधून एकूण आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या विविध ठिकाणी तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा, आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
शेख हसीना यांना आणखी एक धक्का, अंतरिम सरकारने पासपोर्टही केले रद्द !
मुस्लिमांच्या लग्न-घटस्फोटाची नोंदणी काझींकडे न होता सरकार दरबारी होणार
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब? धमकीनंतर प्रवाशांना उतरवले !
“गर्व आहे की संपूर्ण जग भारताचा विश्वबंधु म्हणून आदर करतंय”
दरम्यान, झारखंड दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी (२२ ऑगस्ट) राज्याच्या विविध भागात छापे टाकले. एटीएस पथकाने ‘भारतीय उपखंडातील अल कायद्याशी (एक्यूआईएस) कथित संबंध असलेल्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे रांची, हजारीबाग आणि लोहरदगा येथे एकूण १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. पोलिस अधीक्षक (एटीएस) ऋषभ झा यांनी सांगितले की, छापेमारी अजूनही सुरू आहे. संघटनेशी संबंधित असलेल्या सुमारे सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुरावे तपासले जात आहेत. पुराव्याच्या आधारे अटक केली जाईल.