डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’शी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट आणि दाऊदचा हस्तक रियाज भाटीच्या अटकेनंतर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आज, ११ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. खंडणी विरोधी पथकाने अजय गोसारिया, फीरोज चमडा, समीर खान,अमजद रेडकर आणि आणखी एकाला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वीच गँगस्टर रियाज भाटी याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. मुंबईतील अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेतले होते. मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला होता. वर्सोवा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली

… म्हणून सुरक्षा कवच सोडून जनतेला भेटायला गेले पंतप्रधान मोदी

गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली

आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मुंबई पोलिसांसोबतच सर्व सुरक्षा यंत्रणा त्याच्या कार्यकर्त्यांचा खात्मा करण्यात गुंतल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखा सेल डी च्या कार्यकर्त्यांनावर बारीक नजर ठेऊन आहेत.

Exit mobile version