पुण्यात कस्टम विभागाकडून गांजा तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे.पुणे रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून तब्बल १२० किलो गांजा जप्त केला आहे. पुणे कस्टम विभागाने ही कारवाई केली असून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साधारण ४८ लाख रुपये इतकी आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पुणे कस्टम विभागाला मिळाली होती.संशयित आरोपी सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरणार होते.त्यानुसार पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांचे पथक सोलापूर रेल्वे स्थानकावर पाळत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते.त्यानुसार पथकाने तीन संशयितांची ओळख पटवून ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्यांच्या सामानाची तपासणी केली असता तब्बल १२० किलो गांजा आढळून आला.जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ४८ लाख रुपये इतकी आहे.
हे ही वाचा:
प्रियंका गांधी यांच्या टीममधील माजी सदस्य आचार्य प्रमोद कृष्णन निलंबित!
पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!
भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत अमेरिकी राजदूतांकडून शोक
गांजा बाळगणे आणि अवैध तस्करी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. एनडीपीएस अधिनियम, १९८५ च्या तरतुदींनुसार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे.या टोळीचा प्रमुख कुणाल डोरा हा असून तो ओडिशा येथील रहिवासी आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.पथकाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ९६ किलोचा गांजा जप्त केला होता.जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल एक कोटी ३१ लाख रुपये इतकी होती.