मालाडच्या आप्पापाडा येथे भीषण आग, धुराने सगळा परिसर काळवंडला

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

मालाडच्या आप्पापाडा येथे भीषण आग, धुराने सगळा परिसर काळवंडला

मुंबईतील मालाड पूर्व येथे झालेल्या आप्पा पाडा भागात आगीचे थैमान पाहायला मिळाले. तेथील आनंद नगर झोपडपट्टीला ही भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळाली तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झाल्या. आगीचे मोठमोठे लोळ उठले आणि धुराने सारा परिसर काळवंडल्याचे दिसत होते. या घटनेच्या व्हीडिओतून घटनेची भीषणता स्पष्ट होत होती.

आनंद नगर ही मोठी झोपडपट्टी असून ही आग लेव्हल २ ची असल्याची माहिती समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ही आग लागली ती झोपडपट्टी डोंगरावर पसरली असल्यामुळे ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बराच त्रास सहन करावा लागला.

हे ही वाचा:

भावाने केला बहिणीवर बलात्कार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

भारतातील परिवाराची संकल्पना वेगळी; केंद्र सरकार समलैंगिक विवाहाविरोधात

शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

या झोपडपट्टीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पण तूर्तास तरी कोणतीही जीवित हानी नाही असे स्पष्ट झाले आहे. मात्र हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे.

त्याआधी, ओशिवरा परिसरातही आगीची घटना घडली होती. एकाच दिवसात ही दुसरी आगीची घटना आहे. सकाळी ११च्या सुमारास ओशिवरा येथील फर्निचर दुकानांना आग लागली होती. तिथेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाल्याची माहिती मात्र समोर आली आहे.

Exit mobile version