दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकत ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची तब्बल २ हजार कोटी रुपये इतकी किंमत असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्पेशल सेलने ५६५ किलोहून अधिक कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याची किंमत अंदाजे २००० कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कसे आले, ते कोणाकडे पोहोचवले जाणार होते, या प्रकरणात अजून कोण सामील आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :
चाकूचा धाकाने आधी दागिने लुटले नंतर बलात्कार
अनेक दशके सत्ता राबवूनही काँग्रेसने महिलांची कुचंबणा केली!
इस्रायलच्या हल्ल्यांनंतर बैरुतचे नागरिक घरे सोडून ‘कारमध्ये’
भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजधानीत आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग्ज रिकव्हरी आहे. यामागे अजून कोण आहेत याचा तपास सुरु आहे. यापूर्वी अनेक वेळा कारवाई करून अंमली जप्त केले आहेत, मात्र ही कारवाई सर्वात मोठी असल्याचे म्हटले जात आहे.