28 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरक्राईमनामाटाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन जखमी

टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन जखमी

Google News Follow

Related

झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये शनिवार,७ मे रोजी भीषण स्फोट झाला आहे. स्फोटामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत ३ मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट हा अचानक स्फोट झाला. या प्लांटमधील कोळसा प्रकल्पातील बॅटरी चेंबर क्रमांक ५, ६ आणि ७ मध्ये हा स्फोट झाला. त्यावेळी या चेंबरमध्ये काही कर्मचारी काम करत होते. त्यातील तीन कर्मचारी आगीत जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे कारण कळू शकलेले नाही. चांगली गोष्ट म्हणजे बहुतांश जवान सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली. या घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केले की, जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासन टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने कारवाई करत आहे.

हे ही वाचा:

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लीम डॉक्टरांनी दान केली एवढी मालमत्ता

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट

यापूर्वी देखील २०२१ साली टाटा प्लांटमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी टाटा प्लांटमध्ये काम करताना काही कर्मचारी टाकीमध्ये गरम धातू ओतत होते तेव्हा स्फोटाची घटना घडली होती. त्यावेळी स्फोटामुळे आजूबाजूच्या काही झुडपांना आग लागली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा