जिंदालनंतर बार्शीच्या फटाका कारखान्यात स्फोट

पाच जणांचा मृत्यू

जिंदालनंतर बार्शीच्या फटाका कारखान्यात स्फोट

नाशिकच्या जिंदाल पॉली फिल्म कंपनीच्या स्फोटानंतर लागलेली आग धगधगत असतानाच आता सोलापूरमध्ये स्फोट होण्याची घटना घडली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका फटक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. कारखान्यात फटाके बनवत असतांना हा स्फोट झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या स्फोटानंतर आग भडकली. या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. काही झाल्याची माहिती मिळत असून काहीजण जखमी झाले आहेत.

सोलापूरच्या बार्शी तालीक्यातील पांगरी या ठिकाणी हा फटाक्याचा कारखाना आहे. शिरोळा फायरवर्क्स नावाच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.  या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला आहे. या वेळी कारखान्यामध्ये ४० कर्मचारी काम करत होते असे सांगण्यात येत आहे. या स्फोट ६ ते ७ जण जखमी झाल्याचा अंदाज स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

तोरा संपलाय, नक्षा उतरलाय!

या स्फोटानंतर परिसरात खळबळ माजली. स्फोट झाल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे. या लोकांच्या म्हणण्यानुसार स्फोटात दहा जण जखमी आहेत.

या कारखान्यामध्ये पांगरी जवळ असलेल्या बांगरवाडी, वालवाड, उकडगाव या भागातील लोक काम करतात. या स्फोटानंतर स्थानिक लोक तसेच अग्निशमन दल यांच्या प्रयत्नामुळे आग लवकर नियंत्रणात आणण्यास मदत झाली. हि आग नेमकी कशी लागली हे समंजू शकलेलं नाही. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Exit mobile version