‘मिशन थर्टी डेज’ अंतर्गत पोलिसांकडून ‘ड्रग्स मुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्स माफिया, छोटेमोठे विक्रेत यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. मागील दहा दिवसांत मुंबई पोलिसांनी साडेसात कोटींचा अमली पदार्थ जप्त करून साडेतीनशे जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शाळा, कॉलेजस, धार्मिक स्थळ या ठिकाणी बेकायदेशीररित्या पान टपऱ्या तसेच गुटखा,सिगारेट विक्री करणाऱ्या सुमारे दीड हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी “मिशन थर्टी डेज” मोहीम सुरू करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले होते. मुंबई पोलिसांनी “मिशन थर्टी डेज” अंतर्गत मुंबईतील बडे ड्रग्स माफिया, छोटे मोठे ड्रग्स विक्रेते, त्याच बरोबर मुंबईतील शाळा,कॉलेजस तसेच धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानकाजवळ बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी मागील दहा दिवसांत केलेल्या कारवाईत ७.४४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केलेले असून ३५० जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेने बेकायदेशीर पदार्थाचा पुरवठा केल्याप्रकरणी शाळांजवळील १,३७१ छोटी दुकाने,६,२६३ फुपाथवरील फेरीवाले आणि रेल्वे स्थानकांजवळ कार्यरत २,८१९ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या सर्वाचा आढावा घेतला आहे.
हे ही वाचा:
अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण
पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर
पाकिस्तानमध्ये अटकसत्र सुरूच, फवाद चौधरींना सर्वोच्च न्यायालयाबाहेरून अटक
इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी
मंगळवार वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी बैठकीत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.