मुंबई पोलिसांची भरुचमध्ये मोठी कारवाई, १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत

मुंबई पोलिसांची भरुचमध्ये मोठी कारवाई, १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. पथकाने गुजरातमधील भरुच भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. मुंबई पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय पातळीवर १ हजार कोटींच्या घरात किंमत आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्जच्या कारखान्याचा पथकाने पर्दाफाश केला. पथकाने सुमारे ५१३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत १ हजार २६ कोटी रुपये आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी विभागाने गेल्या १५ दिवसांत केलेली ही मोठी कारवाई आहे. याआधी पोलिसांनी नालासोपाऱ्यात छापा टाकला होता. या कारवाईत ७०३ किलो वजानाचे एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

अंमली पदार्थाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांनी संशय आहे. ही टोळी काही राज्यांमध्ये कार्यरत असून युवकांना लक्ष्य करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरातमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

जन्मठेपेच्या कैद्याला पोलिसांनी दिली ‘मधली सुट्टी’

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर गुजरात एटीएसनं कोस्ट गार्डच्या मदतीनं ड्रग्ज माफियांविरोधात इतिहासातील सगळ्यात मोठी मोहीम पूर्ण केली. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत ४२२ गुन्हे दाखल केले असून जवळपास ६६७ ड्रग्स माफियांना तुरुंगात टाकले आहे.

Exit mobile version