31 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
घरक्राईमनामाभुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

दगडफेकीचे कारण अस्पष्ट

Google News Follow

Related

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेची साखळी खेचून अर्धा तास रेल्वे गाडी थांबवून दगडफेक केल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवार, १२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

शुक्रवार, १२ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची गर्दी होती. ट्रेनमध्येही रोजच्या पेक्षा अधिक गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून ११ वाजता सुटली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा:

पिस्तुल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल

महायुतीने आणले मविआच्या नाकी ‘नऊ’

नेपाळमध्ये ‘प्रचंड’ पराभव!

नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ

व्हिडीओमध्ये दिसून आले की, अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले होते. ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत. यावेळी ट्रेनमधील प्रवासी भीतीपोटी आरडाओरड करीत आहेत. दररोज भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. ही दगडफेक नेमकी का झाली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर काही वेळाने ही रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली. गेल्या काही दिवसांपासून या ट्रेनला खूपच उशीर होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात वारंवार ट्रेन थांबत असल्यानेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या संतापातूनच ही दगडफेक झाली असावी, असा अंदा व्यक्त करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा