फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!

पीडितेकडून इस्लामशी संबंधित कागदपत्रे जप्त

फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून कथित धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यादव समाजातील मुलीच्या कुटुंबीयांनी फैजल उर्फ बादशाहवर लग्नाच्या बहाण्याने त्यांच्या मुलीचे अपहरण करून तिला कलमा पाठ करण्यास लावून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तपासाअंती पोलिसांनी १८ मे रोजी पीडितेची सुटका करून आरोपीला अटक केली. मानवी तस्करीच्या दृष्टीनेही ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितेला समुपदेशनासाठी एका स्वयंसेवी संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.

भोपाळमधील अवधपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘मुस्लिम समाजातील एका तरुणाने आमच्या मुलीला लग्नाच्या बहाण्याने पळवून नेले आणि नंतर तिला कलमा म्हणण्यास भाग पाडले,’ असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी धर्म स्वातंत्र्य कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ‘ईटीव्ही भारत’च्या वृत्तात आरोपीला अटक करण्यात आल्याचा दावा केला जात असताना, काही वृत्तांत पोलिसांनी ते लवकरच आरोपीला अटक करतील, असे म्हटल्याचे नमूद आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपशील समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अण्णा नगरचा रहिवासी असून फैजल उर्फ बादशाह असे त्याचे नाव आहे. पीडित २० वर्षीय तरुणी यादव समाजातील असून ती अवधपुरीची रहिवासी आहे. फैजलवर पीडितेला लग्नाच्या बहाण्याने ११ मे रोजी केरळला नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने पीडितेवर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र, पीडितेने तिच्या नातेवाइकांना फोन करून या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवधपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर, त्याने पीडितेसाठी विमानाचे तिकीट बुक केले आणि तिला भोपाळला परत पाठवले. शनिवार, १८ मे रोजी सकाळी शहरात आल्यानंतर ती आपले म्हणणे देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली.
वृत्तानुसार, हे लव्ह जिहाद किंवा मानवी तस्करीचे प्रकरण असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. फैजल उर्फ बादशाह याच्यावर पीडितेला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा:

इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’

प्रज्वल रेवण्णाला आवाहन ‘घरी परत ये आणि चौकशीला सामोरे जा’

लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे!

फ्री प्रेसशी बोलताना, अवधपुरी पोलिस ठाण्याचे रोशनलाल भारती यांनी सांगितले की, ही महिला अण्णा नगरमध्ये राहायची, जिथे तिने वेगळ्या धर्मातील बादशाह नावाच्या व्यक्तीशी मैत्री केली. ती महिला नंतर अवधपुरी येथे स्थलांतरित झाली परंतु बादशाहच्या संपर्कात राहिली. तिच्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, बादशाहने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले आणि लग्नानंतर तो तिच्यासोबत केरळमध्ये राहणार असल्याचे सांगितले. महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने या समस्येची दखल घेतली आहे.

पोलिसांनी इस्लामशी संबंधित कागदपत्रे जप्त केली
वृत्तानुसार, पोलिसांनी पीडित मुलीकडून इस्लामिक श्रद्धा आणि कलमाशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या बॅगेत पोलिसांना ‘हाऊ टू बीकम अ मुस्लिम’ (मुस्लीम कसे व्हावे) हे पुस्तक सापडले. याव्यतिरिक्त, काही कागदपत्रेही सापडली, ज्यात कलमा कसा पाठ करायचा, याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.
पोलिसांना संशय आहे की मुलीवर धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता. शिवाय, अधिकारी या प्रकरणाचा मानवी तस्करीच्या कोनातूनही तपास करत आहेत.हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार केरळचे कोझिकोड हे एक हॉटस्पॉट बनत आहे जिथून हिंदू मुलींना दुबई आणि इतर ठिकाणी पाठवले जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version