उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये भोले बाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर आणि अन्य काही जणांची नावे यात आहेत. शिवाय या घटनेनंतर भोले बाबा फरार होते. अशातच आता भोले बाबा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
भोले बाबा यांचा व्हिडीओ समोर आला असून त्यांनी म्हटले आहे की, “२ जुलैला जी घटना घडली त्यानंतर मी खूप व्यथित झालो आहे. देव आम्हाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देवो, आम्हाला प्रशासन आणि शासनावर विश्वास आहे. जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा होईल, कुणालाही सरकार सोडणार नाही. आमचे वकील डॉक्टर ए. पी. सिंग यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत. तसेच सगळ्या महापुरुषांना मी विनंती केली आहे की या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना आपल्याला साथ द्यायची आहे. सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे. माझी विनंती सगळ्यांनीच मान्य केली आहे. देव सगळ्यांना सद्बुद्धी देईल. जी घटना घडली त्याचं मला अतीव दुःख झालं आहे. माझ्या संवेदना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसह कायम आहेत, तसंच जे जखमी झाले त्यांनाही आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.”
#WATCH | Hathras Stampede Accident | Mainpuri, UP: In a video statement, Surajpal also known as 'Bhole Baba' says, "… I am deeply saddened after the incident of July 2. May God give us the strength to bear this pain. Please keep faith in the government and the administration. I… pic.twitter.com/7HSrK2WNEM
— ANI (@ANI) July 6, 2024
हे ही वाचा:
ब्रिटननंतर इराणमध्येही सत्तांतर; हिझाब विरोधी नेता बनणार राष्ट्रपती
पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!
तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या
यापूर्वीही भोले बाबा यांनी पत्र प्रसिद्ध करत म्हटलं होतं की, या चेंगराचेंगरीमागे काही समाजकंटकांचा हात आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरू होता. सत्संग समारंभाचा समारोप होत असताना एकाएकी गर्दीत गोंधळ निर्माण झाला आणि धक्काबुक्की झाली. हा समारंभ एका मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. एकाएकी गोंधळ उडाल्यामुळे लोकांची धावपळ झाली आणि काही जणांनी बाहेर पडण्यासाठी एकमेकांना धक्का दिला. यात अनेक लोक जमिनीवर पडले. या पडलेल्या माणसांना उचलण्या ऐवजी लोकांनी त्यांच्या अंगावर पाय देऊन मार्ग काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांचा यात मृत्यू झाला.