29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामा...म्हणून भोजपुरी अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या

…म्हणून भोजपुरी अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या

Google News Follow

Related

जोगेश्वरी येथील एका फ्लॅटमध्ये भोजपुरी अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्रास देणाऱ्या लोकांमुळे तिने ही आत्महत्या केल्याचे कळते. तिला त्रास देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अंधेरीच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात या घटनेचा तपशील नमूद करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ही घटना जोगेश्वरी येथील पार्क हिलच्या सत्यम अपार्टमेंटमध्ये घडली. तिथे रुम नंबर २०२ मध्ये या अभिनेत्रीने ही आत्महत्या केली. या अभिनेत्रीचे नाव सलमा उर्फ संजना उर्फ झारा खातून आहे. या अभिनेत्रीला, तिची मैत्रीण तन्वी टंडन व यश यांना हॉटेल ग्रँड हयात येथे पार्टीसाठी बोलाविण्यात आले होते.

त्या पार्टीमध्ये एन. सी. बी. ची रेड पडल्याचा बनाव करून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी तडजोड रक्कम देण्याकरिता वारंवार सलमा उर्फ संजना उर्फ झारा खातुन हिला धमकावण्यात आले. याचा त्रास होऊन तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे आसीर काझी,  नोफेल रोहे, सूरज परदेशी व त्यांचे सोबतचा एक अनोळखी इसम यांनी संगनमताने कट रचून एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट छापेमारी केली. त्या छापेमारीमध्ये अटक करण्याची भीती घालून फसवणूक केली व तडजोडीची रक्कम खंडणी म्हणून मागितली व तिला आत्महत्या  करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी सूरज परदेशी याला पकडण्यात आले आहे. हा ३८ वर्षीय आरोपी शहापूर येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा:

‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव

हार्बर मार्गावर एसी लोकलच्या काचा फोडल्या

आयआयटी कॅम्पसमध्ये ऑफर्स कोटी कोटी

… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

 

आता आसीर काझी, नोफेल रोहे, एक अनोळखी इसम हे फरार आहेत. पोलिसांनी कलम ३०६, १७०, ४२०, ३८४, ३८८, ३८९, ५०६, १२० ब ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असून नमूद गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा