भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!

केमिकल साठवलेल्या दोन गोदामांसह चपलांचे गोदाम जळून खाक, लाखोंचे नुकसान

भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!

भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामासह चप्पलचे गोदाम असे तिन्ही गोदाम आगीत जाळून खाक झाले आहेत.ही आज आज दुपारी लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून वारंवार घडणाऱ्या अशा घटनेनमुळे नागरिक चौकशीची मागणी पोलिसांकडे करत आहेत.

भिवंडी शहरात मागील काही दिवसांपासून लहान मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत.वारंवार अशा घटनांमुळे नागरिकही त्रस्त आहेत.अशातच आज दुपारच्या सुमारास राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोवींद कंपाऊंड मधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानक आग लागली. या आगीमुळे लगतच्या केमिकल गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलने क्षणातच मोठा पेट घेतला.केमिकल गोदामालगत असलेल्या एका चप्पलच्या गोदामाला आग लागली.

हे ही वाचा:

इस्रायलने जाहीर केले करा अथवा मरा! हमासविरोधातील लढाई दुसऱ्या टप्प्यांत

गेल्या पाच वर्षांत ९९ टक्के बेपत्ता तसेच अपहृत मुलींची सुटका

उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!

आधी हमासच्या नेत्याचे भाषण, दुसऱ्या दिवशी केरळमध्ये स्फोट

अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याचे दिसून येत आहे. तरी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.मात्र या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

चौकशीची मागणी
दरम्यान, भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.मागील घटनांचा आढावा घेतला तर आगीच्या घटनांमुळे जीवितहानीचे प्रमाण कमी असले तरी या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात व्यापाराचे नुकसान झाले आहे. या आगी नेमक्या लागतात कशा याचीही माहिती समोर येणं महत्वाचं आहे. त्यामुळं या आगीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

 

Exit mobile version