घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यादरम्यान होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. या प्रकरणी दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे (वय ५१ वर्षे) याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भिंडे याला बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने १०० हून अधिकवेळा दंड ठोठावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. शिवाय या कारवायांमुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईत अचानक वादळी पावसाने हजेरी लावली होती. यावेळी घाटकोपरमधील एक होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. काही जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला पोलिसांनी अटक केली. भिंडे १९९८ पासून या व्यवसायात असून त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा महापालिकेने दंड ठोठावला आहे.
जाहिरात फलक लावल्याप्रकरणी या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील चार गुन्हे मुलुंड आणि दोन गुन्हे सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी सातवा गुन्हा पंतनगर पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला आहे. महापालिकेने केलेल्या या कारवायांमुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा संशय असून, तो स्वत:च्या नावावर नसलेल्या कंपनीद्वारे काम करत असल्याची चर्चा आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
भारताने केलेल्या चाबहार बंदराच्या करारावर तालिबान खुश; पाकिस्तानला पाजणार पाणी
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
मध्य प्रदेशात निकाहमध्ये घूमर पाहिल्यानंतर मौलवी संतप्त!
रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपये सर्वोच्च लाभांश मंजूर!
वादळामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत १७ जणांना आपला जीव गमावावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला अटक केली असून, घटनेचा तपास सुरू आहे.