अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी कारवाई सुरू आहे. कोण आहे बजरंग खरमाटे? असा सवाल भाजपा नेते आणि आमदार भातखळकर यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. त्यावरून आता चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आमदार भातखळकर यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, हे शोधणे पत्रकारांचे काम आहे. कारवाई सुरू आहे, ती व्यक्ती कुणाच्या जवळची आहे, हे पत्रकारांनी शोधावे. माझ्याकडे माहिती आहे, त्यावर मी ट्विट केले आहे. यातून धागेदोरे लांबपर्यंत जातील.
आमदार भातखळकर म्हणाले की, भाजपाची भूमिका ही सत्य मांडण्याचीच असते. जेव्हा महाभकास आघाडीचे लोक सांगतात, इतक्या कोटींचा भ्रष्टाचार झाला. मग चौकशी करा. पंधरा दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत जे आरोप केले होते., त्यांना पच्रकार विचारणार का, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, ते दिले का? किरीट सोमय्यांच्या पीएमसी घोटाळ्याचे पुरावे देणार होतात ते दिले का, ते विचारा. नवाब मलिक यानी आरोप केले होते, पण पुराव्यांचे काय.
अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 8, 2022
हे ही वाचा:
जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम
शिवसेना नेते संजय कदम यांच्यावर आयकर विभागाची धाड!
तब्बल ३८ वर्षांनंतर प्रशासकाकडे मुंबई महापालिकेचा पदभार
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे
भातखळकरांनी म्हटले की, सरकार महाभकास आघाडीचे आहे. इक्बाल मिर्चीचे भाजपाचे संबंध आहेत असा आरोप केला जात आहे, मग चौकशी करा. दहशतवादविरोधी विभाग आहे ना महाराष्ट्रात मग कारवाई करा. वेड्यासारखए आरोप कसले करत आहात. त्यामुळे अराजक महाराष्ट्रात आहे. सरकार नावाची चीज नाही. सरकारी पक्षच आरोप करत आहेत चौकशी करण्याऐवजी. त्यांचा हात भ्रष्टाचाराने लडबडलेला आहे. सत्य जनतेसमोर येईल. आज महाविकास आघाडी नवाब मलिकचे समर्थन करत आहेत. ८ दिवसांनी त्यांच्यावरही टीका करावी लागेल.