भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

भांडुप पोलिसांकडून गुन्हा दाखल

भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

पूर्व उपनगरातील भांडुप येथे एका खाजगी शाळेत लिफ्ट दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या एका लिफ्ट मॅकेनिकने तीन विद्यार्थीनिंचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लिफ्ट मॅकेनिकला अटक करण्यात आली असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली आहे.

गोपाळ गौडा (२७) असे लिफ्ट मॅकेनिकचे नाव आहे. भांडुप पश्चिम येथील खाजगी इंटरनॅशनल या शाळेची लिफ्ट नादुरुस्त झाल्यामुळे शाळा प्रशासनाने गोपाळ गौडा याला लिफ्ट दुरुस्तीसाठी बोलावले होते. २७ नोव्हेंबर रोजीची ही घटना असून गोपाळ हा लिफ्ट दुरुस्ती करीत असताना शाळेत शिकणाऱ्या १० वर्षाच्या दोन आणि १२ वर्षाची एक अशा तीन विद्यार्थीनी वर्गात जाण्यासाठी निघाल्या असता लिफ्ट मॅकेनिक गोपाळ याने तिन्ही विद्यार्थीनींच्या पाठीवरून हात फिरवुन अश्लील हावभाव केले, या प्रकारामुळे तिन्ही विद्यार्थीनी घाबरल्या आणि तिघीनी झालेला प्रकार वर्गातील शिक्षकांना सांगितला.

शिक्षकांनी तात्काळ हा प्रकार शाळेतील मुख्याध्यापक यांच्या लक्षात आणून दिला, शाळा प्रशासनाने तात्काळ भांडुप पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो आणि विनयभंगांचा गुन्हा दाखल करून गुरुवारी गोपाळ गौडा या लिफ्ट मॅकेनिकला अटक करण्यात आली असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित राज कुंद्राच्या घरासह कार्यालयावर छापे

बांगलादेशातील हिंदू धोक्यात, एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या!

‘इस्कॉन बांगलादेश’चे चिन्मय कृष्ण दास यांना समर्थन, म्हणाले पाठीशी आहोत!

 

Exit mobile version