मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रात म्हणजेच BARC मध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मनीष सोमनाथ शर्मा असे मृत शास्त्रज्ञाचं नाव असून ते ४८ वर्षांचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास मनिष शर्मा यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास मनीष शर्मा यांची पत्नी आणि मुलगा हे बाहेर गेले होते. त्यानंतर हे दोघे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी शर्मा यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. यानंतर शर्मा यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने मनिष शर्मा यांना BARC रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेतला.
हे ही वाचा:
चीनच्या कुरापती सुरूच; अक्साई चीन परिसरात उभारले जात आहेत बंकर
कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर
रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व
लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले
दरम्यान, पोलिसांना मनीष शर्मा यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. “मी माझं आयुष्य संपवतो आहे त्यासाठी मला माफ करा” अशी चिठ्ठी मनिष शर्मा यांनी लिहिली आहे. मात्र, या चिठ्ठीवरून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष शर्मा यांना मानसिक आजार होता. मागच्या २० वर्षांपासून त्यांच्यावर BARC रुग्णालयात उपचार सुरु होते. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.