ईडीने नागपुरातील दहा सुपारी व्यापाऱ्यांवर धाडसत्र राबविले. या धाडसत्रात ईडीने व्यापाऱ्यांकडून तब्बल ११ कोटी ५० लाख रुपयांची सुपारी जप्त केली आहे. यानंतर इडीमार्फत व्यापाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरु होणार असल्याची माहिती आहे.
जुन २०२१ मध्ये सुपारी तस्करीचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी सीबीआयच्या पथकाने मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या पथकाने त्यानंतर नागपूर, मुंबईसह देशभरात १९ ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचेही आढळून आले होते.
पुढे ईडीने मुंबई येथे गुन्हा दाखल करत गुरुवार, १ डिसेंबर रोजी मुंबई व नागपुरातील ईडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी सुपारी प्रतिष्ठानांसह १० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये नागपुरातील सुपारी व्यापारी व गोयल ट्रेडिंगचे प्रकाश गोयल, अल्ताफ कालीवाला, आसिफ, गनी, वसीम बावला, हेमंतकुमार गुलाबचंद, दिग्विजय ट्रान्सपोर्ट कंपनीचे हिमांशू भद्रा आणि दोन सीएचे कार्यालय व निवासस्थानांची झडती घेण्यात आली. त्यात कोट्यवधींचा माल आढळून आला असून, ईडीने तो जप्त केला आहे. व्यापाऱ्यांकडून तब्बल ११ कोटी ५० लाख रुपयांची २९० टन सुपारी आतापर्यंत जप्त केली आहे. तसेच ईडीने १६ लाखांची रोख, प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. आता ईडीद्वारे त्यांच्या अटकेची तयारी करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी
जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?
‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून काम करा!
फडणवीसांच्या प्रयत्नांना आले यश, उपकरप्राप्त इमारतींचा होणार पुनर्विकास
चौकशीदरम्यान, इंडोनेशियातून ही सडकी सुपारी भारतात आणण्यात येत असल्याची माहिती आहे. या सुपारीचा वापर पानमसाला आणि इतर अंमली उत्पादने तयार करण्यात होत असतो. नागपूर व गोंदिया येथे ती साठविण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.