कुर्ल्यातील बेस्ट ई-बस अपघातात मृत्यू झालेल्या फातिमा कनिस अन्सारी (५५) यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्ती काढत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, फातिमा यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा फातिमा यांच्या अंगावरील दागिने चोरीचा आरोप केल्यानंतर आता कुर्ला पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
कुर्ला पश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावरुन सोमवारी रात्री भरधाव वेगाने निघालेल्या ई-बेस्ट बसच्या धडकेत फातिमा अन्सारी यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात बेस्ट बसच्या धडकेने फातिमा या कार खाली येऊन गंभीर जखमी झाल्या होत्या. यावेळी एका व्यक्तीने त्यांची पर्स आणि काही जणांनी त्यांच्या हातातील बांगड्या काढल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा:
जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!
वेलकम फेम मुश्ताक खान यांचेही केले होते अपहरण!
फातिमा या मृत्यूच्या दारात असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी काही जण त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, हे दागिने चोरी होवू नये म्हणून काही व्यक्तींनी दागिने काढले असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे, खरोखरच हा दागिने चोरीचा प्रकार आहे का? याबाबत कुर्ला पोलीस तपास करत आहेत.