बेंगळुरूमधील नागरथपेट भागातील एका दुकानदाराला हनुमान चालीसा लावल्यामुळे मारहाण केल्याची घटना घडली आहे.मुकेश असे मारहाण करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्यामुळे दुकानदाराला काही मुस्लिम तरुणांनी मारहाण केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती देताना बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, रविवारी (१७ मार्च) मारहाणीची घटना घडली.संध्याकाळी ‘अजान’च्या वेळी सिद्दण्णा लेआउटजवळ असणाऱ्या दुकानदार आणि काही लोकांमध्ये वाद झाला. अजान’ सुरु असताना दुकानदार जोरात गाणे वाजवत असल्याच्या कारणावरून काही मुस्लिम तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि वादाला सुरुवात झाली.यानंतर त्या तरुणांची दुकानदाराला मारहाण केली.या प्रकरणी हलसूर गेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पीडित दुकानदाराला उपचारासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकावणे, चिथावणी देणे, धोकादायक मार्गाने दुखापत करणे आणि स्वेच्छेने दुखापत करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही मुस्लिम तरुण दुकानदाराला कसे विरोध करत आहेत.त्यानंतर सर्व तरुणांनी मिळून दुकानदाराला बेदम मारहाण केली. यामध्ये दुकानदार रक्तबंबाळ झालेला दिसत आहे.
हे ही वाचा:
एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश
एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!
कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!
Karnataka | An altercation occurred between a group of people and a shopkeeper last evening during 'Azaan' time when a shopkeeper played a song loudly near Siddanna Layout, in Bengaluru. A few Muslim youths questioned him, and an argument ensued, leading to them hitting the…
— ANI (@ANI) March 18, 2024
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पोलिसांनी पुढे सांगितले की, सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश आणि तरुणा अशा आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आमची चौकशी सुरु आहे.तसेच दुकानदारावर ज्या गटाने हल्ला केला, त्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम तरुणांचा समावेश आहे.
दरम्यान, मारहाण झालेल्या दुकानदाराने सांगितले की, हे तरुण पैसे मागण्यासाठी माझ्या दुकानावर येत असत.पैसे न दिल्यामुळे कित्येकदा वाद झाला आहे.मात्र, त्यांनी रविवारी (१७ मार्च) हनुमान चालीसा लावण्यावर आक्षेप घेतला.यानंतर वाद झाला आणि बदला घेण्यासाठी त्यांनी मला मारहाण केली.