लिव्ह इन जोडप्याने स्वतःला पेटवले!

तरुणीचा आधीच विवाह झाल्याचे समोर आल्यानंतर घटना घडली

लिव्ह इन जोडप्याने स्वतःला पेटवले!

नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर या दोघांनी स्वतःला त्यांच्या राहात्या घरात पेटवून दिल्याची घटना बेंगळुरूमध्ये रविवारी घडली. कोथानूर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

यातील २० वर्षीय विद्यार्थिनीचे नाव सौमिनी दास असे असून ती मूळ पश्चिम बंगालची आहे. तर, तिच्या २९ वर्षीय लिव्ह इन पार्टनरचे अभिल अब्राहम असे असून तो मूळ केरळचा आहे. सौमिनी ही बंगळुरूमधील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होती. तर, अभिल बेंगळुरूतच एक नर्सिंग सर्व्हिस एजन्सी चालवत असे. या दोघांची काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांतच त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

सौमिनी हिचा आधीच पश्चिम बंगालमधील एका तरुणाशी विवाह झाल्याचे समजते. सौमिनी नुकतीच तिच्या मूळ शहरात गेली होती. तिथे तिने तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल आणि पतीसोबत न राहण्याबाबत सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सौमिनीच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे. तिच्या पतीने अभिल आणि सौमिनीला स्वतःला पेटवून देण्यासाठी भाग पाडले असावे, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र खरे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

रविवारी सकाळी त्यांच्या घरातून ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या फ्लॅटकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. सौमिनीचा आधीच मृत्यू झाला होता. तर, अभिलने रुग्णालयात प्राण सोडले. त्यांच्याजवळून कोणतेही पत्र सापडलेले नाही. त्यामुळे आता पोलिस सौमिनी आणि अभिलच्या मोबाइल फोनची तपासणी करून या घटनेमागील कारण शोधणार आहेत.

Exit mobile version