बंगाल भर्ती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जींचे जावई बनले माफीचे साक्षीदार

‘गोपनीय जबाबामुळे’ पार्थ चॅटर्जी यांच्यावरील केस आणखी मजबूत होण्याची शक्यता

बंगाल भर्ती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जींचे जावई बनले माफीचे साक्षीदार

पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांचे जावई कल्याणमय भट्टाचार्य यांना शालेय शिक्षक भर्ती घोटाळा प्रकरणी कोलकात्याच्या विशेष न्यायालयाने ‘अप्रूवर’ (सरकारी साक्षीदार) बनण्यास मंजुरी दिली आहे.

ईडी (प्रवर्तन निदेशालय) द्वारे शालेय शिक्षक भर्ती घोटाळ्यात कल्याणमय भट्टाचार्य यांना आरोपी म्हणून चार्जशीट करण्यात आले आहे. भट्टाचार्य यांनी कोलकात्यातील पीएमएलए (मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा) न्यायालयात अर्ज करून ‘माफीचा साक्षीदार’ होण्याची इच्छा व्यक्त केली होती. न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आता त्यांचा ‘गोपनीय जबाब’ न्यायिक दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवला जाणार आहे.

कल्याणमय भट्टाचार्य हे पार्थ चॅटर्जी यांच्या दिवंगत पत्नीच्या नावाने स्थापन झालेल्या ‘बबली चॅटर्जी मेमोरियल ट्रस्ट’ चे सदस्य होते. हा ट्रस्ट शालेय भर्ती घोटाळ्यात कमावलेले काळे पैसे वळवण्यासाठी वापरण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये या ट्रस्टला ‘आरोपी संस्था’ घोषित केले आहे. एजंटांच्या नेटवर्कद्वारे मिळवलेला काळा पैसा ‘दान’ म्हणून दाखवला जात होता आणि त्याच पैशांचा उपयोग जमिनीच्या खरेदीसाठी केला जात होता.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश, चार दहशतवाद्यांना अटक!

माजी आमदार आसीफ शेख म्हणतात, मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला होता!

दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेलच्या हाती

पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांनी या घोटाळ्यातील कागदपत्रे आणि पुरावे आधीच गोळा केले आहेत.
भट्टाचार्य यांनी चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या ‘गोपनीय जबाबामुळे’ पार्थ चॅटर्जी यांच्यावरील केस आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

२९ व्यक्ती आणि २४ कॉर्पोरेट संस्था किंवा ट्रस्ट यांच्यावर ईडीने आरोप ठेवले आहेत. पार्थ चॅटर्जी, कल्याणमय भट्टाचार्य आणि अर्पिता मुखर्जी हे मुख्य आरोपी आहेत. बबली चॅटर्जी मेमोरियल ट्रस्टसह इतर काही कंपन्यांचेही घोटाळ्यात नाव आले आहे. सुजय कृष्ण भद्रा, जो एका आरोपी कंपनीचा सीओओ होता, त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.

Exit mobile version